मुंबई आयकर विभागातील अपील विभाग आयुक्तांना लाच प्रकरणी अटक
मुंबई आयकर विभागातील अपील विभागाचे आयुक्त बी बी राजेंद्र प्रसाद यांना दिल्ली सीबीआय एसीबीने लाच प्रकरणी अटक केली आहे.
मुंबई : मुंबई आयकर विभागातील अपील विभागाचे आयुक्त बी बी राजेंद्र प्रसाद यांना दिल्ली सीबीआय एसीबीने लाच प्रकरणी अटक केली आहे.
मुंबई सीबीआय एसीबीच्या मदतीने ही कारवाई दिल्ली सीबीआय एसीबीने केली. मुंबई आयकर विभागातील अपील विभागाचे आयुक्त बी बी राजेंद्र प्रसाद यांनी एस्सार स्टील्स विभाग कॅपिटिव्ह पॉवर प्लांटच्या बालाजी ट्रस्टला आयकरमध्ये सूट देऊन गुन्हा न दाखल करण्यासाठी लाच मागितली होती.
या प्रकरणी चौकशीअंती दिल्ली सीबीआय एसीबीने मुंबई आयकर विभागातील अपील विभागाचे आयुक्त बी बी राजेंद्र प्रसाद यांना मुंबईतून अटक केली. काल मघ्यरात्री सीबीआयने आयुक्त बी बी राजेंद्र प्रसाद यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापे टाकून जवळपास दीड कोटी रुपये हस्तगत केले.
याच प्रकरणी राजेंद्र प्रसाद यांना मदत करणा-या आयकर विभागातीलच काही अधिका-यांना आणि खाजगी व्यक्तींना असं एकूण ६ जणांना सीबीआयने अटक केलीये.